नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी घेतली गंभीर दखल!
बारामती(वार्ताहर): मोबाईल द्वारे विवाहित महिलेस अश्लिल मेसेज पाठवून महिलेची छेडछाड करून जातीवाचक शिवीगाळ करणार्या आरोपीस बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणाची नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी गंभीर दखल घेत सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदास आठवले यांना माहिती दिली असता, त्यांनी या गुन्ह्यातील आरोपी पंप्या उर्फ अमर गोविंद गावडे याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी एट्रोसिटी ऍक्टच्या कलम 7 (2) नुसार मे.विशेष न्यायालयात अहवाल पाठवण्याच्या तसेच गुन्ह्यातील आरोपी व त्यांच्या नातेवाईकांपासून फिर्यादी व साक्षीदारांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून पोलीस संरक्षण द्यावे.तपास गुणवत्तेच्या आधारे सखोल करावा आशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक (ना.ह.सं) कैसर खालिद, पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपविभागीय अधिकारी (प्रांत) दादासाहेब कांबळे,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना पत्राद्वारे दिल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की मौजे गुणवडी ता.बारामती जि. पुणे येथील पंप्या उर्फ अमर गोविंद गावडे याच्यावर विवाहित महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करून तिचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीसस्टेशनमध्ये दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी गु.र.नं.0436/2020 भा.द.वी.354A,341,504,506, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 3(1)आर,एस,डब्ल्यू,आय,वाय, 3(2)व्ही ए,ना.ह.सं 7(1)व या कलमांनुसार गुन्हा दाखल झाला असून तपास उपविभागीय पोलिस अधीक्षक नारायण शिरगावकर हे करीत असून आरोपीस अटक करून मे.विशेष न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कास्टडी मंजूर झाली सरकारतर्फे प्रसन्न जोशी व फिर्यादीच्या वतीने वरिष्ठ विधीज्ञ विजयसिंह मोरे पाटील यांनी जोरदार बाजू मांडली पोलिसांनी कसून तपास करून आरोपीकडून गुन्ह्यातील महत्वपूर्ण पुरावा असलेला मोबाईल फोन व बीएमडब्ल्यू कार जप्त केली आहे.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य व्यवस्थापक अंपल खरात, पश्चिम महाराष्ट्र सचिव वर्षा शेरखाने, विभागीय अध्यक्ष संजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे यांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची भेट घेऊन आरोपीवर कडक कारवाईसाठी निवेदन दिले. मिलिंद मोहिते साहेबांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांना तात्काळ अहवाल मागितला आहे.