कोरोना प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केलेल्या ठिकाणच्या नागरीकांवर लक्ष ठेवण्याची गरज

खाजगीत पॉझिटीव्ह, सरकारी निगेटीव्ह हे न पाहता स्वत:चे व स्वत:च्या कुटुंबियांचे संरक्षण करा!

बारामती(वार्ताहर): एखाद्या घरात कोरोना रूग्ण सापडल्यानंतर सदरचा परिसर कोरोना प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात येतो. पॉझिटीव्ह रूग्ण हॉस्पीटलला उपचार तर घेत असतो मात्र, त्याच्या कुटुंबातील व्यक्ती घोषीत केलेल्या क्षेत्रात न राहता तो इतरत्र  फिरताना दिसतो किंवा पै-पाहुण्यांच्यात रमलेला दिसत आहे. यामुळे रूग्ण वाढीसाठी कारणीभूत ठरणार्‍यावर संबंधित खात्यातने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

                रूग्ण सापडल्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र सिल करताना बारामती नगरपरिषदेचे अधिकारी संतोष तोडकर व त्यांच्या कर्मचार्‍यांना लगतच्या घर व दुकानदांराकडून विरोध होताना दिसतो. काही महाभाग तर अंगावर सुद्धा धावून येण्यास मागे पुढे पाहत नाही. जसं की, संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी यांच्या घरात, दुकानात विषाणू सोडला आहे आणि त्या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी सदरचे क्षेत्र सिल करीत आहेत. रात्रीचा दिवस करून हे अधिकारी व कर्मचारी कळताच क्षणी त्याठिकाणी प्रतिबंध करीत असतात. यांच्या मानसिकतेचा विचार करणे गरजेचे आहे.

                खरे तर नगरपरिषद/आरोग्य विभाग कर्मचारी यांनी कुटुंबातील वाहने वगळता अन्य व्यक्ती यांना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व बाहेर पडण्यास बंदी करणे गरजेचे आहे. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती त्यांच्या घराबाहेर पडून वस्तु आणण्यास किंवा इतर कामास बाहेर पडताना दिसत आहे. त्यामुळे नगरपरिषद व आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. अशा व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्याची गरज आहे.

                खाजगी चाचणी केली असता पॉझिटीव्ह व सरकारी चाचणी केल्यास निगेटीव्ह यामध्ये  नागरीक गुंतून पडलेले दिसत आहेत. यामधून नागरीकांनी स्वत:चे व स्वत:च्या कुटुंबियांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. खाजगी चाचणीचा अहवाल (ऍन्टीजन) 2 तासात येतो. सरकारी चाचणीचा अहवाल (आर्टीफिसीयल)  येण्यास किमान 7 तास लागतात. ही चाचणी अचूक येते. कित्येक कुटुंबात सर्व कोरोना रूग्ण बाधीत झालेले दिसले आहेत. यामुळे ऍन्टीजन चाचण्या करणे गरजेचे आहे यामधून बाधित व्यक्ती इतरांच्या संपर्कात येऊ नये व तो अलिप्त रहावा. यामध्ये भिऊ नये कुटुंबातील वयस्कर व्यक्तींशी दूर राहणे महत्वाचे आहे. अन्यथा बाधीत व्यक्ती संपूर्ण कुटुंबाला लागण केल्याशिवाय राहत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!