बारामती(वार्ताहर): बारामती हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये व्यापारी महासंघा तर्फे महिला दिन साजरा करण्यात आला.
या सेंटरमध्ये असणार्या बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा ताई तावरे, शोभा देशमुख, सरिता मुथा, व स्टाफ मधल्या महिला परिचारिका यांना जागतिक महिला दिनानिमित्त पुष्पगुच्छ देवून शुभेच्या देण्यात आल्या व केक कापून महिला दीन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, किराणा असोसिशनचे अध्यक्ष प्रमोद खटावकर, ऑटोमोबाईलचे अध्यक्ष मनोज मुथा, कापड असोसिशनचे अध्यक्ष प्रफुल मोता, हॉटेल असोसिशनचे वैभव तावरे, बिल्डर असोसिशनचे माजी अध्यक्ष सुनील देशमुख, सत्यवान घाडगे इ. या प्रसंगी उपस्थतीत होते.