बारामती(वार्ताहर): महिलांना संधी उपलब्ध करून दिल्यास महिला काय करू शकतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बारामती शहर पोलीस स्टेशनला जागतिक महिला दिनानिमित्त हनीट्रॅप करून खंडणी वसुल करणार्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईचे कौतुक सर्वत्र होत आहे. यादिवशी पोलीस स्टेशन प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक सौ.ए.के.शेंडगे, ठाणे अंमलदार सौ.आर.बी.आटोळे (म्हस्के) ठाणे अंमलदार मदतनीस सौ.एन.आर.र्किदक, सी.सी.टी.एन.एस. सौ.एम.के.माकर व वायरलेस सौ.एस.जे. कांबळे यांनी चोख व सक्षमपणे जबाबदार्या पार पाडल्या. दिवसभरात येणार्या तक्रारी, गार्हाणी ऐकून सोडविण्याचा प्रयत्न केला. बारामती शहर पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलीसांनी उत्तमरीत्या सांभाळल्यामुळे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी शुभेच्छा देवून कौतुक केले आहे.