बारामती(वार्ताहर): महिला दिनाचे औचित्य साधुन सुरू केलेले बारामती कराटे क्लब भविष्यात महिलांचे कवच बनेल असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले.
जागतीक महिला दिनाचे औचित्य साधत बारामती कराटे क्लबचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री.शिरगावकर बोलत होते. यावेळी नगरसेविका सौ.अनघा जगताप, डॉ.सुहासनी सातव, सौ.अनिता जगताप, दिनेश जगताप, पुण्यनगरीचे बारामती विभागाचे प्रमुख अमोल यादव, क्लबचे प्रमुख मिननाथ भोकरे, योगेश ढवाण, धीरज पवार, ओंकार पाठक, अमोल भिंगारे, समीर ढोले इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर व पालकांसमोर क्लबच्या विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी कराटेची धडाकेबाज प्रात्यक्षिक दाखवली. येणार्या काळात मुली व महिलांसाठी स्वसंरक्षणासाठी कराटे किती महत्त्वाचे हे दाखवुन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षिका शिवानी काटे-देशमुख कदम बोलताना म्हणाल्या की, मुलींनी कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी सतर्क असले पाहिजे. क्लबमध्ये प्रवेश घेणार्या मुली व महिला व पंधरा वर्षा खालील मुलांना इंटरनॅशनल कराटे महिला खेळाडु मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण व प्रवेश सुरू आहेत. पहिल्या 50 प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना कराटेचा ड्रेस फ्री दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार रुपाली गिरमे यांनी मानले.