वतन की लकीर (ऑनलाईन): दि.7 मार्चच्या रात्री 9 वाजेपर्यंत पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 19 हजार 465 रुग्णांपैकी 3 लाख 96 हजार 244 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. एक्टीव्ह रुग्ण 14 हजार 10 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.20 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.46 टक्के आहे.
बारामतीत रविवारी आरटी-पीसीआर चाचणी घेण्यास सुट्टी किंवा काही तास असल्याने सदरची आकडेवारी वाढलेली दिसत आहे. त्यामुळे नागरीकांनी मनामध्ये भिती बाळगू नये. प्रशासन आपल्या हाकेला धावणारे आहे. मास्क, सॅनिटायझर व गर्दी जाण्यास टाळा व स्वत:ची काळजी घ्या.
बारामतीत दि. 08 मार्च 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 56 तर ग्रामीण भागातून 24 रुग्ण असे मिळून 80 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 325 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 22 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 02 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 31 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 08 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे.
शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 80 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 6 हजार 742 रुग्ण असून, बरे झालेले 6 हजार 315 आहे तर मृत्यू झालेले एकशे शेहचाळीस आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 24 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 07 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.