शारदानगर(वार्ताहर): ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज शारदानगर येथे केदार जाधव चिफ डिझाईन इंजिनियर (म्युनिक जर्मनी) येथून ऑनलाईन पद्धतीने वरिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा आणि डे-स्कूलमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपल्या ओघवत्या शैलीत ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. जर्मन भाषा सोप्या आणि सहज पद्धतीने मराठी भाषेत शिकविण्यासाठी युट्युब व्हिडीओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. जर्मन भाषेमधील करियरच्या आणि रोजगाराच्या संधी याविषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जे.साठे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.महामुनी, कला व वाणिज्य शाखाप्रमुख प्रा.ए.एस. कदम यांनी मार्गदर्शन केले.
सदर उपक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. एम. एस. निंबाळकर (भूगोल विभाग प्रमुख) यांनी कार्य केले. या ऑनलाइन कार्यक्रमासाठी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.