छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून जयंती साजरी

बारामती(वार्ताहर): श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन छत्रती शिवाजी महाराज उद्यान येथे राजे ग्रुपतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून एक विधायक उपक्रमातून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे स्वियसाह्यक हनुमंत पाटील, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, गटनेते सचिन सातव, विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल शिंदे, समिर ढोले, ऍड.भार्गव पाटसकर, प्रणव सोमाणी, विक्रम अमराळे, राहुल हिरेमठ, सुजित जाधव, गणेश कदम, धीरज पवार, योगेश ढवाण यांच्या शुभहस्ते या युनिटला श्रीफळ फोडून पुष्पहार घालून यंत्रणा सुरू करण्यात आली.

राजे ग्रुपने सामाजिक भावनेतून जे कार्य केले त्याचा आदर्श इतर मंडळाने व युवा पिढीने घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!