बारामती(वार्ताहर): भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा संयोजक अनुसूचित जाती मोर्चा सोशल मिडीया ग्रामीणच्या संयोजकपदी सचिन गोपाळ मोरे यांची नुकतीच जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, संघटन सरचिटणीस धमेंद्रजी खंडारे यांच्या मंजुरीने व अनुसूचित जाती मोर्चा पुणे ग्रामीणचे अध्यक्ष मयुर कांबळे यांनी नियुक्ती केली. सचिन मोरे यांनी भाजपाचे बारामती शहर माजी अध्यक्ष यशपाल भोसले यांचे मनापासून आभार व्यक्त केले. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री.मोरे यांनी नियुक्तीवेळी सांगितले.