भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी मुकेश वाघेला

बारामती(वार्ताहर): भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी मुकेश वाघेला यांची जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, अनुसूचित जाती मोर्चा पुणे ग्रामीणचे अध्यक्ष मयुर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश थोरात हे उपस्थित होते.

मुकेश वाघेला यांनी यापुर्वी अनुसूचित जाती मोर्चा बारामती शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे. पक्षाच्या विविध कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. वेळोवेळी अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत आलेले आहेत. शहराध्यक्ष पदातून त्यांनी बारामती शहर व तालुक्यात चांगला नावलौकीक मिळविलेला आहे. नियुक्तीबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!