चंद्रमणीनगर ओऍसिस व्यायामशाळेच्या नुतनीकरणाचे उद्घाटन संपन्न

बारामती(वार्ताहर): प्रभाग क्र.17 आमराई भागातील चंद्रमणीनगर ओऍसिस व्यायामशाळेचे उदघाटन नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर, बांधकाम सभापती सत्यव्रत काळे, नगरसेवक व स्थानिक नगरसेवक बिरजू मांढरे, अभिजित जाधव, सुधीर पानसरे, नगरसेविका सौ.निता चव्हाण, सौ.संगीता सातव, सौ.अनिता जगताप, सविता जाधव, बेबीमरियम बागवान, आरती शेंडगे, विजयराव खरात, माजी नगरसेवक अभिजित चव्हाण, रा.कॉ.पक्षाचे पदाधिकारी भानुदास बागाव, गजानन गायकवाड, नितीन शेलार, बबलू जगताप, शक्ती भंडारे, श्रीकांत पाथरकर, सागर जाधव, उत्तम धोत्रे, अरविंद बगाडे, कैलास शिंदे, तैनूर शेख, सामाजिक कार्यकर्ते सिध्दांत सावंत, उमेशभाऊ शिंदे, नितीन पवार, अमोल भोसले,बापू भालेराव, मंगेश खंडाळे, पवन पवार, गोटया चितारे, आकाश शिंदे, सुरज शिंदे इ. मान्यवर उपस्थित होते.

आमराई भागातील तरुणांची बर्‍याच दिवसापासूनची मागणी होती, आमराईतील सर्वांत मोठी व्यायामशाळा असून तेथील दुरावस्थेमुळे युवकांना इतर ठिकाणी व्यायामासाठी जावे लागते, खाजगी व्यायामशाळाची फी जास्त असल्या कारणाने तरूण व्यायामापासून वंचित राहात होते, बांधकाम सभापती असताना मयुरी सुरज शिंदे यांनी स्थायी समिती मिटींगमध्ये विषय मंजूर करून कामाचा सातत्याने पाठपुरावा केला तसेच नवीन व्यायामाच्या साहित्यांची जिल्हा क्रीडा संकुल पुणे यांच्याकडे मागणी करून नवीन साहित्य उपलब्ध करून दिले. उदघाटनावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी चंद्रमणीनगर मधील युवकांना व्यायामाचे महत्व सांगितले, व्यायामशाळेची स्वच्छता व निगा राखण्यासाठी सुचना केली. सर्व मान्यवरांचे स्थानिक नगरसेविका मयुरी सुरज शिंदे व बिरजु मांढरे यांनी स्वागत केले.

यावेळी प्रभाग क्र 17 मधील मार्केट रोड कोअर हाऊस शेजारी सभामंडप बांधणे व प्रबुध्दनगर आंबेडकर स्टेडियम लगत सार्वजनिक शौचालयास पाण्याची टाकी बांधणे याही कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!