अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाचे शरदचंद्रजी पवार फिटनेस हेल्थ क्लबतर्फे शिवजयंतीनिमित्त पुशअप, पुलअप, स्कॉटस्‌ व बॉडी बिल्डींग स्पर्धा संपन्न

बारामती(वार्ताहर): श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुशअप, पुलअप, स्कॉटस्‌ व बॉडी बिल्डींगच्या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.

19 फेब्रुवारी रोजी अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ संचलित, खा.शरदचंद्रजी पवार साहेब फिटनेस हेल्थ क्लब कोष्टी गल्ली बारामती याठिकाणी स्पर्धा संपन्न झाल्या. सदरच्या स्पर्धा प्रशिक्षक संतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या होत्या.

स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची स्फूर्ती वाढविण्यासाठी बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी बारामती तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, बारामती सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष ऍड.श्रीनिवास वायकर, अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव, माजी अध्यक्ष बापू जाधव, उद्योजक दीपक कुदळे, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष दीपक बर्गे, ऑक्सिजन फिटनेट क्लबचे संचालक प्रेम जाधव, पत्रकार तैनुर शेख, आनंद धोंगडे, संतोष जाधव, अमित बगाडे इ. मान्यवर उपस्थित होते.

प्रथम पारितोषिक पटकाविणार्‍यास ट्रॅकसूट, चषक व पीनटबटर देण्यात आले. द्वितीय पारितोषिक पटकाविणार्‍यास चषक पीनटबटर देण्यात आले. शिवाजी महाराजांचे कार्य व विचार नविन पिढीने आत्मसात करावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री.जगताप यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जगन्नाथ लकडे, ऍड.श्रीनिवास वायकर, तैनुर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रशिक्षक संतोष जगताप यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!