बारामती(वार्ताहर): बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने 21 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी (गादी व माती) कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते.
गादी प्रकारातील स्पर्धेचे उद्घाटन बारामती नगरपरिषदेचे बांधकाम सभापती पै.सत्यव्रत काळे तर माती प्रकारातील स्पर्धेचे उद्घाटन दूध संघाचे कामगार संचालक प्रकाशराव काटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पै.पोपटराव गावडे, पै.दिलीप काटे, पै.विनायक शेळके, पै.सुधाकर माने, पै.किसनराव जाधव, पै.सादिक आतार, पै.अमोल भागवत, पै.शरद झांबरे, पै.निलेश जगदाळे इ. उपस्थित होते. पंच म्हणून संभाजी पवार, अशोक करे, पै.सागर माने, गणेश जाधव, कु.अनिता गव्हाण, वस्ताद सदाशिव कोरटकर यांनी चोख कामगिरी पार पाडली.
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ बारामती बिल्डर असोसिएशनचे संचालक पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडला.
गादी विभागत निवड झालेले.. (कंसात वजनगट)
स्वप्निल भिमराव शेलार (57), प्रविण शेलार (61), सागर वाघमोडे (65), रोहित धनंजय भोसले (70), भूषण दत्तात्रय नेवसे (74), गणेश शामराव निंबाळकर (79), प्रथमेश चंद्रकांत सोकटे (86), अभिषेक दिलीप घाडगे (92), अभिषेक राजकुमार देवकाते (97) व महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज सुहार भांड यांची निवड करण्यात आली.
माती विभागत निवड झालेले.. (कंसात वजनगट)
महेश शिवाजी येळे (57), प्रथमेश प्रविण तावरे (61), सौरभ राजकुमार जाधव (65), नागेश अजित डोंबाळे (70), अतिश रमेश दिवटे (74), संदीप शंकर शिंदे (79), शंकर सुभाष माने (86),अंगद सुर्यकांत बुलबुले (92), रोहन संपतराव जाधव (97) तर महाराष्ट्र केसरीसाठी अनिकेत चौधर यांची निवड करण्यात आली.