बारामती(उमाका): राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांना आज जयंतीदिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार महादेव भोसले यांनी गाडगेमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तहसिल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती पी.डी शिंदे, श्रीमती मनिषा चव्हाण, एस.व्ही. देष्टेवाड, श्रीमती कांबळे तसेच तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.