बारामती(वार्ताहर): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने 17 डिसेंबर 2019 रोजी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याची लेखी स्वरूपात मागणी केली होती. त्या मागणीला प्रत्यक्षात 18 फेब्रुवारी 2021 रोजी रस्त्याचे काम सुरू करून यश आले.
प्रभाग क्र.17 मधील वडकेनर ते पोस्ट ऑफिस रोड (माता रमाई भवन) आणि वडकेनगर ते प्रबुद्धनगर नामफलक ते दोशी हॉस्पिटल पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात यावे यासंबंधीचे निवेदन बारामती नगरपरिषदेला देण्यात आले होते. त्याअनुषंगाने 18 मार्च 2020 रोजी नगरपालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभा क्र.7 मध्ये सदर रस्त्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे.
रिपाइचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र(पप्पू)सोनवणे यांच्या शुभहस्ते रस्त्याचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रिपाइचे तालुका सरचिटणीस संजय वाघमारे, बारामती शहर उपाध्यक्ष सुदर्शन भोसले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कांबळे, अविनाश कांबळे यासोबत स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते. यावेळी स्थानिक नगरसेविका व नगरपालिका प्रशासन यांचे देखील आभार मानण्यात आले.