बारामती(वार्ताहर): ब्लु पॅथर सामाजिक विकास प्रतिष्ठान व मकसद युथ फाऊंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजाला सोबत घेऊन मुस्लिम समाजाच्या वतीने बहुजनप्रतीपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सावित्रीबाई फुले सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमत: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास शिवभक्त, मानवाधिकार समितीचे शहराध्यक्ष मुनीर तांबोळी यांनी मोजक्या शब्दांत उपस्थितांच्या डोळ्यासमोर मांडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्लु पॅथर सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी केले तर मकसद युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अमीर शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी ब्लु पॅथर सामाजिक विकास प्रतिष्ठानचे सचिव अक्षय शेलार, कार्याध्यक्ष मयुर कांबळे, विक्रम पंत थोरात, मकसद युथ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अकिल बागवान, कार्याध्यक्ष सोहेल मुलाणी, अहमद शेख, अफसर बागवान, इरफान,मुन्ना बागवान,मन्सुर शेख,अतुल गोडसे, अरबाज झारी, सलिम शेख, मुस्तकीम अत्तार, हुसेन शेख इ. कार्यकर्ते उपस्थित होते.