बारामती: वास्का कराटे असोसिएशनच्या वतीने 7 गटांमध्ये 49 खेळाडूंची कलर बेल्ट परीक्षा नुकतीच संपन्न झाली. यापैकी 28 खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी दाखविल्याने त्यांना गोल्ड, सिल्व्हर व ब्रांझ पदक देण्यात आले. उमर खान व सोहम महाजन हे दोघे येलो बेल्ट परीक्षेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याने परीक्षकाने त्यांना ऑरेंज बेल्ट प्रदान केले त्यामुळे या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
22 फेब्रुवारी रोजी सायं.4 ते रात्रौ.8 वाजेपर्यंत वीरशैव मंगल कार्यालय भिगवण रोड, बारामती याठिकाणी वर्ल्ड ऑथोरीटी शोतोकॉन कराटे-दो असोसिएशनच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती.
विद्या प्रतिष्ठानचे विश्र्वस्त मंदार सिकची, वीरशैव लिंगायत समाज ट्रस्टचे अध्यक्ष समीर ढोले यांच्या शुभहस्ते मेडल व बेल्ट प्रदान करण्यात आले.
गट नं.1- मनस्वी गावडे (गोल्ड), क्रीशव मेहता (सिल्व्हर), अनन्या मोकाशी व संस्कार दळवी (ब्रांझ) गट नं.2-रइंश सिकची (गोल्ड), स्वरा शिंदे (सिल्व्हर), शौर्यन राजेनिंबाळकर व स्वराज चव्हाण(ब्रांझ) गट नं.3-संस्कृती जाधव(गोल्ड),शिवम गिरी (सिल्व्हर), संस्कृती दळवी व सान्वी आगवणे (ब्रांझ) गट नं.4- कुलसूम खान(गोल्ड), श्रावणी गदादे (सिल्व्हर), श्रावणी महाजन व अमय खराडे (ब्रांझ) गट नं.5- गायत्री गावडे (गोल्ड), विराज वागडोळे (सिल्व्हर), राजन खराडे व वृंदा मकदूम (ब्रांझ) गट नं.6- उमर खान (गोल्ड), सोहम महाजन(गोल्ड),अर्जुन कोकणे (सिल्व्हर), वरद शिंदे (ब्रांझ) गट नं.7 अथर्व भोसले (गोल्ड), रंम्या बर्डे (सिल्व्हर), सर्वज्ञ जाधव व स्मित महाजन (ब्रांझ)
परीक्षक म्हणून वास्का इंडियाचे प्रमुख मिननाथ भोकरे व सातारा जिल्ह्याचे सचिव धीरज कदम यांनी काम पाहिले. सर्व यशस्वी खेळाडूंना वास्का कराटे असोसिएशनचे प्रशिक्षक सेम्पई अनिकेत जवळेकर, सेम्पई हर्षदा गावडे व सेम्पई मंथन भोकरे यांनी मार्गदर्शन केले.