बारामती(वार्ताहर): कचरा डेपो बारामती येथील कचरा वेचक महिलांना साडी,मास्क,आयुर्वेदिक औषधी वनस्पती देऊन सन्मान करून कृतिशील शिवजयंती साजरी करण्यात आली.
यशश्री फाऊंडेशनच्या अध्यक्षा ऍड.सुप्रिया बर्गे यांच्या संकल्पनेतून कृतिशील शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून शिव वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यावेळी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे शहर प्रमुख ऍड.विशाल बर्गे यांनी शिवकाळातील कायदा व्यवस्था, शासन तसेच महिलांबाबत धोरण कसे होते या बाबत माहिती दिली.यशश्री फाऊंडेशनच्या आरती तावरे, धनश्री भरते, स्वाती बाबर, शोभा मांडके व इतर महिला पदाधिकार्यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. ऍड.सुप्रिया बर्गे यांनी या महिलांचे कायदेविषयक अडचणी समजून घेतल्या व सामोपचाराने प्रश्न सोडवणे बाबत आश्वासन दिले. नगरसेवक अतुल बालगुडे, हेमंत नवसारे यांच्या हस्ते आयुर्वेदिक औषधी वनस्पती यांचे वाटप करण्यात आले. तसेच शिव ज्योती पतपेढी तर्फे मास्क चे वाटप करण्यात आले.