बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनइर कॉलेज बारामती या विद्यालयात 32 वा रस्ता सुरक्षा सप्ताह चे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.रस्ता सुरक्षा व वाहन सुरक्षा या विषयी विद्यार्थ्यांना जनजागृती निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. हा कार्यक्रम मुख्यत्वे इ 11 वी व 12 वी च्या विद्यार्थी साठी ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे परिवहन अधिकारी विनायक साखरे, जयवंत पोळ व सहा.परिवहन अधिकारी ऋषिकेश हांगे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विना परवाना वाहन चालवणे,तसेच रस्त्यावरील वाहन चालवताना घ्यावयाची दक्षता, हेल्मेट काळाची गरज या विषयी विद्यार्थांचे उद्बोधन प्रमुख पाहुणे यांनी केले. प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक विष्णू बाबर,ज्युनइर विभागाचे प्रमुख आनंदराव करे, जयवंत मांडके, महादेव शेलार, मनोज वाघमोडे ,विद्यालयातील आर.एस.पी.प्रमुख सुदाम गायकवाड व इतर शिक्षक उपस्थित होते. प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शुभांगी रुपनवर यांनी तर आभार हरिश्चंद्र यादव यांनी केले.