बारामती(वार्ताहर): दरवर्षी अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळ श्रीमंत आबा गणपतीतर्फे मोठ्या दिमाखात हजारो भाविकांना अन्नदान करून गणेश जन्म साजरा केला जातो. मात्र, कोरोनाचे सावट पाहता साध्या पद्धतीने गणेश जन्म साजरा करून बप्पाकडे कोरोनाचे जे संकट दूर व्हावे यासाठी सर्वानुमते प्रार्थना करण्यात आली.
सकाळी आरती करून दुपारी 12:00 वा गणेश जन्म सोहळा व विविध मान्यवरांच्या हस्ते आरती घेण्यात आली व पाळणा गाऊन श्री गणेश जन्म सोहळा साजरा करण्यात आला.
कोरोनाची पार्श्र्वभूमी पाहता सालबाद प्रमाणे 5 हजार लोकांचा महाप्रसाद रद्द करून साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. प्रसाद दिवसभर पुरेल अशी व्यवस्था मंडळाने केली होती. महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. मंडळाने स्वदेशी वापरला चालना मिळावी म्हणून नितीन भागवत यांच्या स्वदेशी वस्तूच्या स्टॉलचे उद्घाटन करून स्वदेशी वस्तू वापराचा नारा दिला.
संध्याकाळी श्रींची महाआरतीचा कार्यक्रम संपन्न झाला यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव, मोहन पंजाबी, अविनाश भापकर, स्वप्नील शेळके, निलेश गायकवाड, जयसिंग पवार, सुभाष सोमाणी, किरण इंगळे, प्रकाश पळसे, ऍड.रीतेश सावंत, स्वप्नील भागवत, सोनू बामने, सोनू जाधव, राहुल जाधव, शांताराम बागल, चेतन बा.जाधव, प्रथमेश गायकवाड, दिपाली श्रीकांत जाधव, डॉ.प्रशांत हेंद्रे, अनिता गायकवाड, वंदना भंडारे, राजश्री शिंदे, सौ.ज्योती इंगळे, सौ.ज्योती लडकत इ. महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.