इंदापूर(वार्ताहर): माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राम मंदिर बांधकामासाठी इंदापूर तालुक्यातुन 51 लाख रूपयांचा निधी जमा करण्यात आला. या निधीमध्ये 21 लाख रुपये किमतीचे चेक व ऑनलाइन तीस लाख असा 51 लाखाचा निधी इंदापूर तालुक्यातून श्री राम मंदिर बांधकामासाठी देण्यात आला. सदरचा निधी संकलन करण्यासाठी विश्र्व हिंदू परिषदेचे ऍड.जी.बी.गावडे, दिलीप शिंदे, अतुल तेरखेडकर, दिपक पेशवे, मंगेश मासाळ तसेच इंदापूर तालुक्यातील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.