बा.न.प.समितीच्या निवडी जाहीर!

बांधकाम समितीच्या सभापतीपदी सत्यव्रत काळे तर पाणीपुरवठा सभापतीपदी रमेश भोकरे

बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषद विविध समितीच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असुन, सार्वजनिक बांधकाम विभाग समिती सभापतीपदी सत्यव्रत काळे तर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी रमेश भोकरे यांची निवड करण्यात आली.

या निवडीसाठी तहसीलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. नगरपरिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता असल्याने सर्वच निवडी बिनविरोध पार पडल्या. यावेळी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद यांनी त्यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्यामुळे उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्षांकडे सुपूर्द केला.

स्थायी समितीमध्ये पौर्णिमा तावरे, सचिन सातव, किरण गुजर, कमल कोकरे यांच्यासह सर्व समित्यांचे सभापती. स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती सुरज सातव, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती बेबी मरियम बागवान, महिला व बालकल्याण समिती सभापती आशा माने, उपसभापती ज्योती सरोदे यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!