संजय संघवी का? अभिजीत उर्फ बाळासाहेब जाधव
बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाचा एक वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने उर्वरीत काही महिन्यांसाठी उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
संजय संघवी यांचा अनुभव पाहता यापुर्वीही त्यांनी विविध पदे भूषविलेले आहेत. व्यापारी दृष्टीकोन पाहिला असता संजय संघवी यांना सुद्धा उपनगराध्यक्ष पद दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभिजीत उर्फ बाळासाहेब जाधव हे वाढीव हद्दीतील नगरसेवक आहेत. पहिल्या वर्षी वाढीव हद्दीतील उपनगराध्यक्ष झाले होते शेवट उपनगराध्यक्षावर होईल असे नागरीकांमध्ये बोलले जात आहे.
बाळासाहेब जाधव यांनी शिक्षण समितीचे सभापती असताना केलेल्या कामाचा व त्यांच्या प्रभागात प्रत्येक नागरीकांच्या हाकेला धावणारा व तत्परतेने काम मार्गी लावणारा नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. शांत, संयमी स्वभावामुळे त्यांनी कित्येकांची मने जिंकलेली आहेत. वाढीव हद्दीतील जळोची हे विकसित व नगरपरिषदेचे उत्पन्न वाढीचा प्रभाग म्हणून पाहिला जातो त्यामुळे बाळासाहेब जाधव यांच्या गळ्यात सुद्धा माळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तांदुळवाडी येथुन समीर चव्हाण, सौ.अनघा जगताप, अतुल बालगुडे यांचीही नावे चर्चेत आहेत. आतापर्यंतच्या निवडीत जे कधी चर्चेत नसतात त्यांचीच कित्येक वेळा वर्णी लागलेली आहे. सौ.वीणा बागल, संतोष जगताप, सौ.आशा माने यांचीही वर्णी लागू शकते. नागरीकांमधून संजय संघवी व अभिजीत जाधव यांच्याच नावाचा जोर धरलेला दिसत आहे.