वतन की लकीर (ऑनलाईन): दि. 17 फेब्रुवारी 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 26 तर ग्रामीण भागातून 11 रुग्ण असे मिळून 37 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 140 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 17 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात सुद्धा रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला नाही. 22 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 09 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे.
शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 37 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 6 हजार 474 रुग्ण असून, बरे झालेले 6 हजार 212 आहे तर मृत्यू झालेले एकशे पंच्चेचाळीस आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 28 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
सध्या जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी करता येणार नाही. मात्र, जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू नाही असे जिल्हाधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले.
मास्क न लावणार्या नागरिकांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्ण आढळणार्या परिसराचे सर्वेक्षण केले जाणार आहे; तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिली.
लग्न समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली असून, या समारंभाच्या ठिकाणी गर्दीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. लग्नसमारंभामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी मास्क लावले आहेत की नाहीत, हे समारंभाच्या ठिकाणी जावून तपासले जाणार आहे असे जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले.