वतन की लकीर (ऑनलाईन): निवडणूका बिनखर्चाच्या व्हाव्या आणि या निवडणूकांमधून सेवाभावी कार्यकर्ते संसदेत जावेत असे परखड मत व्यक्त करणारे माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी सकाळी साडे नऊ वाजता दु:खद निधन झाले.
मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेऊन त्यांनी सन 1989 ते 1995 या काळात मुंबई उच्च न्यायालय, सुप्रीम न्यायालय याठिकाणी न्यायाधीश म्हणून काम केले. वर्ल्ड प्रेस काऊन्सिल व प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे. पुण्यातील पहिली एल्गार परिषद त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणुन सुरूवातीच्या काळात समन्वय समितीचे ते अध्यक्ष होते. गोध्रा दंगलीप्रकरणी स्थापित सदस्यीय ट्रिब्युनलचे सदस्य होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिलेले होते.
त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.