वतन की लकीर (ऑनलाईन): लसीकरण सुरू होऊन महिना झाला. दुसर्या फेरीला सुरूवात झाली. रूग्णाचा आलेख खाली होता तो पुन्हा वाढत चाललेला दिसत आहे. लस आली म्हणून नागरीकांनी कोरोनाला दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. नागरीकांच्या मास्क तोंडाला दिसत नाही. सॅनिटायर सर्वांच्या खिश्यात असायचे आता एखाद दुसर्यांच्या खिश्यात दिसत आहे. सर्व काही सुरळीत सुरू असल्यासारखे नागरीक कृती करताना दिसत आहे.
दि. 13 फेब्रुवारी 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 11 तर ग्रामीण भागातून 02 रुग्ण असे मिळून 13 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 87 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 08 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात सुद्धा रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला नाही. 16 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 02 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे.
शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 6 हजार 400 रुग्ण असून, बरे झालेले 6 हजार 165 आहे तर मृत्यू झालेले एकशे पंच्चेचाळीस आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 18 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 03 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.