बारामती(वार्ताहर): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या लीगल सेल(लॉयर फोरम) पुणे जिल्हा उपाध्यक्षपदीपदी ऍड.सुप्रिया विशाल बर्गे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे नियुक्ती पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे शुभहस्ते देण्यात आले.

ऍड. बर्गे या यशश्री फाऊंडेशन च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे महिलांना कायदेशीर मदत करीत आलेल्या आहेत. शेतीविषयक कायदे, मोटार वाहन अपघात कायदे, घरगुती हिंसाचार कायदे, शक्ति कायदा आसे अनेक कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन यासाठी विविध खेडोपाडी, शाळा महाविद्यालयात कार्यशाळेतून मार्गदर्शन व लैंगिक शोषण रोखण्यासाठी कार्यशाळा आयोजित करून बलात्कार, विनयभंग, अपहरण, रॅगिंग रोखण्यासाठी उपाययोजना करून जनसामान्यांना कायदेविषयक माहिती देऊन न्यायालयीन सेवेत मदत केली आहे.
मानव संरक्षण समिती नवी दिल्ली (भारत सरकार) या संस्थेच्या वतीने मानव ह्क्क व संरक्षण या संदर्भात नागरिकांचे कायदेविषयक प्रश्र्न सोडवित आहे. त्यांच्या या कार्यासाठी राज्यस्तरीय भारत ज्योती प्रतिभा संपन्न एक्सलैन्स पुरस्कार 2020 यांना प्राप्त झाला आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय उपलब्ध करून देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यात यावे व समाजात सुरक्षित वातावरण निर्माण होईल व अन्याय अत्याचार रोखण्यास मदत होईल.
ऍड.भगवानराव साळुंके यांच्या शिफारशीने व ऍड.दिलीप कारंडे यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती करण्यात आली आहे. सदरच्या निवडीत माजी नगरसेविका सौ.आरती शेंडगे यांचा सिंहाचा वाटा असल्याचेही सौ.बर्गे यांनी सांगितले आहे.