बारामती (वार्ताहर): कोरोनाच्या काळात दिव्यंगत झालेले शिक्षक कै.खवळे, कै.वाघमोडे व कै.मोटे यांच्या स्मरणार्थ माजी विद्यार्थी डॉ.महेश घोळवे यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता.
या कार्यक्रमास योगायोग असा की, कै.वाघमोडे सरांनी सन 1972 ते 2000 पर्यंत ज्या शाळेत सेवा केली त्यांचे चिरंजीव परेश वाघमोडे उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांबद्दल असणारे प्रेम, आदर पाहुन परेश भावनिक झाले होते. डॉ.घोळवे यांच्या उच्च विचारांचे त्यांनी आभार मानले. मुख्याध्यापक श्री.थोरात यांनी ओळख करून दिली. परेश वाघमोडे हे वडिलांच्या पेन्शन संदर्भात शाळेत गेले असता ही आनंदाची गोष्ट अमोल निंबाळकर या शिक्षकांनी सदरची माहिती दिली.