बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे परिश्रम अथक! 12 पिस्टल व 20 राऊंडसह 12 आरोपी अटक!!

बारामती: बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आतापर्यंत 12 पिस्टल व 20 राऊंडस्‌ हस्तगत करून 12 आरोपींना अटक करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली.

या पत्रकार परिषदेस अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे उपस्थित होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुका पोलीस स्टेशनला गु.र.नं.25/2021 नुसार भा.द.वि.कलम 394, 385,34 वगैरे या जबरी चोरीमधील आरोपीकडे विना परवाना 7 पिस्टल व 10 राऊंड पिस्टल मिळाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी इतर मित्रांकडे विनापरवाना पिस्टल असल्याची माहिती दिली.

या गुन्ह्याचा तपासकरीत असताना आरोपी नामे हनुमंत अशोक गोलार (वय-22, रा.जवळवाडी, खरवंडी कासार, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर), अल्ताफ सज्जद पठाण (वय-30, रा.नाईकवाडी मोहल्ला, ता.शेवगाव, जि.अहमदनगर), संतोष प्रभाकर कौटुंबे (वय-38, रा.मारवाडगल्ली, ता.शेवगाव, जि.अहमदनगर), जफर अन्सार इनामदार (वय-28, रा.नाईकवाडी मोहल्ला, ता.शेवगाव, जि.अहमदनगर) व जावेद मुनीर सय्यद (वय-22, रा.आखेगाव रोड, भापकरवस्ती, ता.शेवगाव, जि.अहमदनगर) हे सर्वजण पिस्टल विक्री करण्यास येणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली असता, पथकाने या आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता 5 पिस्टल व 10 राऊंड मिळून आले.

या आरोपींवर भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 अन्वये अनुक्रमे गु.र.नं. 64/2021, 65/2021,66/2021,67/2021 व 68/2021 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पो.ह. दादा ठोंबरे, पो.कॉ.नंदु जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे, दत्तात्रय मदने यांनी केले आहे.

बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे दक्ष अधिकारी लाभल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पो.ह.दादा ठोंबरे, पो.कॉ.नंदु जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे, दत्तात्रय मदने गुन्हे उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या पथकातील कर्मचारी सतत तत्पर व दक्ष असतात. जिवाची बाजी लावून गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये यांचा हातखंडा आहे. अशा कर्मचार्‍यांमुळे पोलीस विभागाबरोबर बारामतीच्या नावलौकीकात आणखीन भर पडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!