बारामती(वार्ताहर): तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील जेष्ठ प्रशासकीय अधिकारी सौ.सुषमा संगई यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कार जाहीर झाला आहे.
10 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी होणार्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. रोख 11 हजार, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रशासनास हा पुरस्कार प्रथमच प्राप्त होत आहे. सौ.सुषमा संगई या गेली 25 वर्षांपासून कार्यरत असून त्या गेली 6 वर्षांपासून लघुलेखक पदावर कार्यरत आहेत. अनेकान्त एज्युकेशन सोसायटी तसेच महाविद्यालयाच्या लेखा विभागामध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. महाविद्यालयाच्या तीनही नॅक मुल्यांकनामध्ये त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारीची कामे केली आहेत. तसेच ’उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ मिळणेबाबतच्या कामांमध्ये त्यांचे योगदान संस्मरणीय आहे. या पुरस्काराने त्यांनी संस्था व महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव जवाहर शाह वाघोलीकर, संस्थेचे विश्वस्त, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सौ.संगई यांचे अभिनंदन केले आहे.