ज्येष्ठांच्या हक्काच्या सदनिकेतून, लेखी हमी देत भाडेकरू निघाला बाहेर
बारामती (वार्ताहर): भाड्याचे घर खाली कर या युक्तीप्रमाणे शिक्षक भाडेकरू मे.कोर्टाने वारसाहक्काने दिलेल्या घरातून बाहेर निघत नव्हता. ज्येष्ठांनी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याकडे व्यथा मांडताच सदर शिक्षक भाडेकरूने बाहेर निघण्याची लेखी हमी देवून अल्पावधीतच या ज्येष्ठांना आपली हक्काची सदनिका मिळणार आहे.
या कामी ट्रेनी उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहायक फौजदार संदीपान माळी, पोलीस हवालदार अनिल सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेंडगे आदींनी सहकार्य केले.
म.ए.सो विद्यालयातील उपमुख्यध्यापक म्हणून काम केलेले कै.श्रीकांत प्रभुणे व त्यांच्या पत्नी कै.उषा प्रभूणे यांच्या मालकीची सदनिका अशोकनगर येथे आहे. या सदनिकामध्ये भाडे तत्वावर शिक्षक दाम्पत्य मुलासहीत राहत आहे. प्रभूणे पती-पत्नीचे निधन झाल्यावर कायदेशीररित्या मे.कोर्ट आदेशानुसार वारस म्हणून कै.श्रीकांत प्रभूणे यांचे बंधू संजय गजानन प्रभूणे रा.सासवड यांच्या नावावर सदर सदनिका झाली आहे परंतु शिक्षक दाम्पत्य सदनिकाचे भाडे देत नव्हते,विकत घ्या म्हटले तर विकत घेत नव्हते, सदनिका सोडून जावा म्हटले तर सोडून जात नव्हते त्यामुळे संजय प्रभूणे यांनी अनेकांना मध्यस्थी करण्यास सांगितले, समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी विकत घ्या म्हणून सांगितले. पोस्टाच्या माध्यमातून नोटीस दोनदा दिली परंतु शिक्षक दाम्पत्य सदनिका सोडण्यास किंवा ताबा देण्यास तयार नव्हते व प्रभूणे यांना कोणत्याच प्रकारे दाद देत नव्हते. अखेर वैतागलेल्या प्रभूणे दाम्पत्याने पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांची भेट घेऊन सर्व कहाणी सांगितली, कागदपत्रे दाखवली. सर्व पुरावे व परिस्थिती पाहिल्यावर त्या शिक्षक दाम्पत्यास पोलीस स्टेशनला बोलावून खाकी भाषा मध्ये कायद्यानुसार कारवाई होऊ शकते हे समजवून सांगितल्यावर सदर दाम्पत्याने सदर सदनिका सोडून जाण्याची व लवकरच सदनिकाचा ताबा प्रभूने दाम्पत्यास देणार असल्याची लेखी हमी दिली.
यामुळे ज्येष्ठ दाम्पत्यास शहर पोलीस स्टेशन च्या वतीने न्याय मिळाला चे समाधान वाटल्याने सदर दाम्पत्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ व पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे आभार मानून सन्मान केला.