गोतंडी(अशोक घोडके यांजकडून): नुकत्याच ग्रामपंचायत गोतंडीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा लागला आहे.
नवनिर्वाचित सरपंच गुरूनाथ (बच्चाराम) नलवडे, उपसरपंच परशुराम तुकाराम जाधव यांची तेरा मतापैकी आठ मते मिळवून सरपंच व उपसरपंच पदाची निवड झाली. नुतन सदस्य किशोर अंकुश कांबळे, संगीता बाळु बनसोडे, छगन दादाराम शेंडे, जयश्री संजय मारकड, पल्लवी पांडुरंग पिसे, मनिषा पोपट नलवडे यांची निवड झाली. खा.सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांचे मार्गदर्शनाखाली आगामी काळात गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी त्यांनी सांगितले.