बारामती(वार्ताहर): फिर्यादीने केलेले आरोप मे.कोर्टात सिद्ध करू न शकल्याने हुंड्याच्या गुन्ह्यातील शरद पवारसह इतर आरोपींना प्रथमवर्ग न्यायालय श्रीमती डी.एस.खोत यांनी निर्दोष मुक्तता केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी पत्नी हिने पती शरद प्रभाकर पवार (रा.अंबिकानगर, बारामती) व त्यांच्या बहिणी नयन गोरख राक्षे (रा.भाळेगाव, अहमदनगर) व केतकी जयवंत शिंदे (रा.आंबेगाव बुद्रुक, ता.हवेली) यांचे विरूद्ध बारामती शहर पोलीस स्टेशनला भा.द.वि.कलम 498अ,323, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार मे.कोर्टात फौजदारी खटला सुरू होता. आरोपी पत्नी हिने फिर्यादी यांना 2006 पासुन त्रास देत होती. सतत चारित्र्यावर संशय घेत होती व 2008 ला दुसरी मुलगी झाली तेव्हापासुन आरोपी पती शरद हे बहिणींचे ऐकून त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली होती. फिर्यादी पक्षाने बहिण, वडिल यांची साक्ष घेतली असता फिर्यादी केलेले आरोप सिद्ध करू शकले नाही त्यामुळे मे.कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीतर्फे ऍड.प्रसाद खारतुडे व ऍड.प्रिती शिंदे यांनी काम पाहिले. फिर्यादीने आरोपींवर बिनबुडाचे लावलेले आरोप मे.कोर्टात सिद्ध न करू शकल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.