बारामती प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेने प्रेक्षकांचे डोळ्याचे पारणे फेडले : दिमाखात स्पर्धा सुरू

बारामती(वार्ताहर): ज्याप्रमाणे बारामती राजकीय पंढरी म्हणून संपूर्ण देशात ओळखली जाते त्याप्रमाणे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममुळे दर्जेदार व नियोजनबद्ध विविध संघटनांतर्फे स्पर्धा भरवून क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख होऊ लागली आहे.

बारामती प्रिमियर लिग बीपीएल-2021 भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन शनिवार दि.6 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.खलाटे, सचिव अरविंद जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री.ओहोळ, संतोष सातव, प्रताप पागळे, उत्तम धोत्रे इ. मान्यवर उपस्थित होते.

आयपीएलच्या आधारावर बीपीएल मध्ये देखील लिलाव पद्धतीने टेनिस बॉलवर 12 संघ एकमेकांशी लढत असल्याचे मुख्य आयोजक अभिजीत कांबळे, योगेश व्हटकर, रविंद्र (पप्पू) सोनवणे,सुरज अहिवळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

नोबल वॉच ऍण्ड मोबाईल नोबल मॉल तर्फे प्रथम क्रमांकास 61 हजार, नगरसेवक गणेश सोनवणे व अतुल बालगुडे यांच्यातर्फे 41 हजार, हॉटेल ग्रँडचे मालक नगरसेवक सत्यव्रत काळे यांच्यातर्फे तृतीय 31 हजार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा चिटणीस सुखदेव हिवरकर यांच्यातर्फे चतुर्थ बक्षिस 25 हजार, कै.राज दिवेकर यांच्या स्मरणार्थ पाचवे बक्षिस 21 हजार, बीपीएल प्रेमी ज्ञानेश्र्वर परजणे-पाटील यांच्यातर्फे सहावे बक्षीस 15 हजार, सुज्योत एंटरप्रायजेस व सामाजिक कार्यकर्ते संतोषआण्णा सातव यांच्यातर्फे सातवे बक्षिस 11 हजार, आठवे बक्षीस सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार व फुलचंद गुजर यांच्यातर्फे 10 हजार, साबळेवाडी शिर्सुफळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश दत्तात्रय साबळे यांच्यातर्फे नववे बक्षीस 7 हजार, रइल इस्टेट डेव्हलपर्स बारामती सरकार ग्रुप केतन भारत गार्डी तर्फे दहावे बक्षिस 7 हजार, बाबासाहेब पाचंगे व जोशी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप साळुंके यांच्यातर्फे अकरावे बक्षिस 5 हजार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस काटेवाडी सरचिटणीस प्रशांत एकनाथराव काटे यांच्यातर्फे बारावे बक्षिस 5 हजार तर आकर्षक सामन्यासाठी बक्षिस बारामती पॉवर्स विरूद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र या संघास सामाजिक कार्यकर्ते पिंटु भाऊ गायकवाड यांच्यातर्फे 11 हजार रूपये बक्षिस ठेवण्यात आले आहे.

द मोबाईल पॅलेसचे सचिन अंधारे व व्हीआरएस जीमचे रोहित बोराडे यांच्या सौजन्याने ऑनलाईन युट्युब स्पर्धेचा आनंद लुटता येत आहे.

1 ते 12 संघांना आकर्षक चषक खडकी कँटोमेंट बोर्ड पुण्याचे नगरसेवक दुर्योधन तुकाराम भापकर यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. सामनावीर चषक पुजा एंटरप्रायजेसचे सुमित यादव यांच्यातर्फे तर सन्मान चिन्ह फुल ऍण्ड फायनल ग्रुप तर्फे देण्यात येणार आहे.

मॅन ऑफ दि सिरीजसाठी नगरसेवक जयसिंग देशमुख यांच्यातर्फे 43 इंची एलईडी टीव्ही, उत्कृष्ठ फलंदाजासाठी अष्टविनायक मोबाईलचे मालक विक्रांत सप्रे यांच्यातर्फे स्मार्टफोन, उत्कृष्ठ गोलंदाजीसाठी फ्रेण्डस्‌ मोबाईल झोनचे परेश विकर यांच्यातर्फे स्मार्टफोन, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण करणार्‍यास साहिल चव्हाण यांच्यातर्फे कुलर व यष्टीरक्षकास चारूदत्त काळे यांच्यातर्फे कुलर देण्यात येणार आहे. असे इतर बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!