बारामती(वार्ताहर): ज्यांनी सर्वात जास्त गोपनीय पोलीस विभाग चोखपणे सांभाळले असे मितभाषी मनमिळावू बारामती तालुका पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र व्ही. शेंडगे यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम दि.27 जानेवारी 2021 रोजी ओम-साई लॉन्स पाहुणेवाडी याठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सुधीर पाटसकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ऍड.राजेंद्र काळे, माजी जि.प.अध्यक्ष विश्र्वास देवकाते, माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, उद्योजक श्री.सोळसकर इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून श्री. शेंडगे यांनी पोलीस सेवेत केलेल्या सेवेबाबत सर्वांनी गौरोद्गार काढून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्कारास उत्तर श्री.शेंडगे यांची ज्येष्ठ कन्या हिने सर्वांचे आभार मानले. यावेळी श्री.शेंडगे भावूक झाले होते.
सदर सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण व सर्व पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी केले होते. यावेळी श्री.शेंडगे यांच्यावर प्रेम करणारा मित्र परिवार, पोलीस कर्मचारी, पत्रकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट देशभक्ती गीताने झाला.