नगरपरिषदेने जप्त केलेले वजन काटे परत करण्याची मागणी

बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेने हॉकर्स झोन केलेले नसल्याने नगरपरिषद हद्दीत इतरत्र व्यवसाय करणार्‍यांचे वजन काटे जप्त करण्यात आलेले आहेत ते परत करण्याची मागणी मकसद युथ फाऊंडेशन व ब्ल्यू पँथर सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे बा.न.प.चे मुख्याधिकारी यांना लेखी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

बारामती नगरपरिषद व बारामती शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या व्यवसाय करणार्‍यांवर केलेल्या कारवाईमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी जप्त वजन काटे परत करावे अशीही विनंती केली आहे. जर वजन काटे न दिल्यास योग्य ते सविनय मार्गाने आदंोलन करण्यात येईल असे मकसद फौंडेशनचे अमीर शेख, अकील बागवान, सोहेल मुलाणी व ब्ल्यू पँथर सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगलदास निकाळजे, मयूर कांबळे, रोहित भोसले असेही निवेदन दिल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!