बारामती (वार्ताहर): बारामती अजुनही सावकारी फोफावत आहे. यांनी कित्येकांची त्यांनी वाट लावली आहे आता आपण त्यांची वाट लावूया. जर कोणी चुकीच्या गोष्टी, कायद्याचे उल्लंघन, नियमांच्याबाहेर जावून प्रयत्न करीत असेल मग तो दोन-तीन पिढ्या आमच्याबरोबर राहिलेला असला तरी,त्याची हयगय केली जाणार नाही असे परखड मत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत नगरपरिषद क्षेत्रात 7 व 9 मीटर उंचीचे पथदिवे उभारणे. शहरामध्ये पावसाळी गटर करणे या विकास कामांचे भूमिपूजन समारंभा प्रसंगी ना.पवार बोलत होते.
या कार्यक्रमास बारामती टेक्सटाईलच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रावहिनी पवार, दौंडचे माजी आ.रमेश थोरात, उपनगराध्यक्ष तरन्नुम सय्यद, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, विरोधी पक्ष नेते सुनिल सस्ते, मुख्याधिकारी किरणराज यादव नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुढे ना.पवार म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था चांगली असली पाहिजे यासाठी माळेगाव, सुपे याठिकाणी पोलीस स्टेशनचे काम करीत आहोत. भगिनींना फिरताना सुरक्षित वाटले पाहिजे. अल्पसंख्यांकांना सुद्धा सुरक्षित वाटले पाहिजे असे म्हटले. दोन-तीन अपवाद वगळता नगरपरिषद व पंचायत समितीच्या वतीने निवडून देता तेवढी जबाबदारी वाढत असते. पंचायत समितीचेही काम पूर्णत्वाकडे जात आहे. विकास काम करीत असताना कठोर भूमिका घ्यावी लागते. ज्या कोणाची रस्त्यात जागा जात असेल तर त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही.
कार्हाटी येथे मूलशिक्षण संस्थेचे काम सुरू आहे. सुप्या छोटी विद्यानगरी स्थापन करीत आहोत. बंद पाईपलाईन मधून गॅस घरपोहच मिळणार आहे. बारामतीकरांसाठी आणखीन दोन रूग्णवाहिका दिल्या आहेत. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचे काम केले आहे. मुस्लीम समाजाला दफनभूमी, शादीखाना व ऊर्दू हायस्कुल चे काम सुरू करणार आहोत. सीएसआर फंडाचा पुरेपूर वापर आपण करीत आहोत. परकाळे बंगला ते तीन हत्ती चौकाचे संपूर्ण काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात येणार आहे. कित्येकांनी यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली त्यास लागणारे डिझेलचे पैसे पक्षाच्या वतीने देण्यात आलेले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत आहे त्याठिकाणी लवकर उभी राहणार आहे कोणीही घरापासून वंचित राहणार नाही असेही श्री.पवार म्हणाले.
महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत नगरपरिषद क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांवर 7 मीटरचे 2480 तर 9 मीटर उंचीचे 1060 पथदिवे उभे केले जाणार आहेत. या करीता 15 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. याशिवाय शहरात सुमारे 30 ठिकाणी पावसाळी गटर काम (स्टार्म वॉटर ड्रेनेज लाईन) केले जाणार आहे. याकरीता 10 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. या विकासकामांमुळे शहरातील विविध रस्ते पथदिव्यांनी उजळणार आहेत. पावसाळ्यात पाणी साठून राहण्याची व घरात पाणी शिरण्याची समस्या कायमची मिटणार असल्याचे नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्र्वर जगताप यांनी केले तर शेवटी आभार उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद यांनी मानले.
टोलेजंग इमारतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत होणार!
वसाहतीवर पडलेले आरक्षण व तेथील कुटुंबियांना तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र ठेवल्याने विरोधकांनी बदनामीचा ढोल वाजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या आशिर्वादामुळे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे यांच्या पाठपुराव्यामुळे, पडलेले आरक्षण उठवून आहे त्याच ठिकाणी टोलेजंग डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीची इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे कोणीही बेघर राहणार नाही.
पवार कुटुंबियांच्या तीन-तीन, चार-चार पिढ्या बरोबर असणारी काही मंडळी आजही सावकारांना पाठीशी घालीत आहेत. ना.अजितदादांनी अशा मंडळींना बाजुला ठेवावे अन्यथा पक्ष व आपली बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही.