वतन की लकीर (ऑनलाईन): पुणे विभागातील 5 लाख 70 हजार 104 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 92 हजार 436 झाली आहे. तर क्टीव रुग्ण संख्या 6 हजार 253 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 79 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.71 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बर्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.23 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
दि. 04 फेब्रुवारी 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 02 तर ग्रामीण भागातून 04 रुग्ण असे मिळून 06 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 57 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 03 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 01 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 12 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 01 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे.
शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 06 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 6 हजार 287 रुग्ण असून, बरे झालेले 6 हजार 053 आहे तर मृत्यू झालेले एकशे पंच्चेचाळीस आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 11 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 02 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.