बारामती(वार्ताहर): बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र सैनिक उत्तराधिकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि.30 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजून 59 ते 11 वा.2 मी. हुतात्मा स्तंभ, वंदेमातरम् चौक (भिगवण चौक) याठिकाणी हुतात्मा दिन साजरा होणार असल्याचे संघटनेचे निलेशभाई कोठारी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
तालुका स्वातंत्र सैनिक संघटना हे 1949 सालापासुन हुतात्मा दिन पाळत आलेली आहे. भारत देश स्वातंत्र्य करण्यापासून ते आजपर्यंत भारत देशाची सेवा करताना ज्यांनी-ज्यांनी प्राणाची आहुती व बलिदान दिले आहे त्यांचे कृतज्ञता व आठवण व्यक्त करण्यासाठी व नविन येणार्या पिढीला जुन्या इतिहासाची माहिती मनामध्ये ज्वलंत राहण्यासाठी व महात्मा गांधीजींचे आचार विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी श्रद्धांजलीचा कार्यक्रम होत असतो.
तरी बारामतीतील तमाम नागरीकांनी वेळेवर उपस्थित रहावे असेही आवाहन निलेशभाई कोठारी यांनी केले आहे.