फलटण तालुक्यातील उपळवे हत्याप्रकरणी फेर चौकशी करून सरकारी वकिलाची नेमणूक करावी.
बारामती(वार्ताहर): फलटण तालुक्यातील उपळवे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणी फेर चौकशी करून आरोपीस कठोर कारवाई व्हावी. तसेच सदर प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी यासाठी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होलार समाज संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
फलटण तालुक्यातील उपळवे येथील बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या झाली नसून तीची हत्या केली असल्याचा संशयित आरोप अल्पवयीन मुलीच्या आईने उपस्थित केला आहे. फलटण तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलीच्या आईने ऑक्टोबर रोजी आपली मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी संबंधित मुलीचा मृतदेह गावाजवळील एका विहिरीत सापडला. विशेष म्हणजे मृतदेहाची अवस्था संशयास्पद होती, त्या मुलीच्या कमरेला दगड बांधले होते. तरीही स्थानिक पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा शिक्का मोर्थ केल्याची माहिती अल्पवयीन मुलीच्या आईने दिली आहे.
सदर अल्पवयीन मुलगी ही अनुसूचित जातीतील हिंदू होलार या समाजातील असल्याने सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम करून जातीपातीचे राजकारण केलं जातं असल्याची ही माहिती अल्पवयीन मुलीच्या कुठुबीयानी दिली. दरम्यान या सर्व घटनेचे रितसर चौकशी करून आरोपीस कडक शासन कारवाई करावी तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होलार समाज शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी होलार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बळवंत माने, बाळासाहेब देवकाते, बाळासाहेब जाधव, भारत देवकाते, राजाभाऊ माने, छगन गोरे, पत्रकार सुरज देवकाते यासह कार्यकर्ते उपस्थित होते.