बारामती(वार्ताहर): बारामती स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष सतिश ननवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी प्रशांत सातव उपस्थित होते.
या स्पर्धेत केनिया, युरोप कंट्री, युथोपिया येथील खेळाडू सहभागी होणार आहेत. सायकल राईड करून राज्यातील 350 किल्ल्यांची माहिती इतिहासतज्ञांकडून तरूणांना दिली जाणार आहे. याची सुरूवात बारामतीतून झालेली आहे याची व्याप्ती मर्यादित न ठेवता महाराष्ट्रभर करणार असल्याचे श्री.ननवरे यांनी सांगितले.
मंगळवारी सायकल ट्रेनिंग, बुधवार ते शुक्रवार डेंगळे गार्डन येथे स्ट्रेंथ वर्कआउट घेतला जाणार असुन 8 ते 65 वर्षाच्या नागरीकांना मोफत ट्रेनिंग देणार आहे. शहीद झालेल्या व सीमेवरील सैनिक यांची कृतज्ञता म्हणून 26 जानेवारीला रक्तदान शिबीर घेण्यात आले. 10 किमी फास्ट रनिंग, 21 किमी हाफ रनिंग, 42 किमी फुल मरेथॉन तर प्रत्येकाला भाग घेता येईल अशी 3 किमी फन रन होणार आहे. सहभागी प्रत्येक खेळाडूंना आकर्षक किट, मेडल मिळणार आहे. स्पर्धेसाठी 3 हजार पाहुणे येणार आहेत.