बारामती(वार्ताहर): राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर युवक अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. इच्छुकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचेकडे अर्ज दाखल केलेले आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये पक्षाचे काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण करणारा व पक्षाचे ध्येय, उद्दीष्ट युवकांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचविणार्या युवकाला संधी देण्याची गरज आहे. बारामतीत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करणार्या युवकाची गरज आहे.
पार्थ प्रविण गालिंदे या युवकाने सुद्धा मागणी केलेली आहे. पार्थच्या पाठीमागे पक्षाचा अनुभव, एकनिष्ठता व राजकीय, सामाजिक वलय आले. त्यामुळे काम करण्यास अवघड जाणार नाही. बारामतीत असे काही कुटुंब आहेत की, पवार कुटुंबियांच्या सुख, दु:खात, रात्र-अपरात्री सदैव पाठीशी उभे राहणारे आहेत त्यामध्ये एक गालिंदे कुटुंब म्हणून ओळखले जाते. पार्थने लॉकडाऊन काळात केलेले कार्य वाखण्याजोगे आहे. अज्ञात शत्रूशी दोन हात करीत त्याने गोर-गरीब कुटुंबाला मदत केली. विविध वस्तुंचे वाटप केले. पार्थच्या पाठीशी सामाजिक, राजकीय गाढा अनुभव असल्याने त्याने सामाजिक कार्यात दोन पाऊल पुढे येऊन कामे केली आहेत.
पार्थ हा उच्चशिक्षीत सिव्हील इंजिनइर आहे. मावळ लोकसभा निवडणूकीत त्याने प्रचार व काम केले आहे. बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीत सुद्धा पक्षाचे विचार नागरीकांमध्ये पोहचविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आजचा युवक कसलेही आव्हान स्वीकारुन तडीस नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. धैर्य, धाडस बरंच काही जाणून घेण्यास, करण्यास उत्सुक असतो. युवक देशाच्या उन्नतीचा खरा आधार आहे. ठोस बदल घडवून आणण्याचे धाडस यांच्यामध्ये असते. योग्य वेळेत, योग्य कारणासाठी या युवकांचा उपयोग करून घेणे हिताचे ठरते.