बारामती(वार्ताहर): ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना, दलित पँथर संघटना, सत्याचा प्रहार संघटना, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, बारामती लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमानाने व मेडिकोज गिल्ड यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते.
आरोग्य तपासणी शिबीरामध्ये संपूर्ण बॉडी चेकअप आणि शुगर,बिपीची तपासणी करण्यात आली. जे अधिकारी व कर्मचारी शिबीरास उपस्थित राहू शकले नाही त्यांनी आमच्या हॉस्पिटलला येऊन मोफत तपासनीचा लाभ घ्यावा.
बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, शहरचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिरासाठी मेडिकोज गिल्डचे अध्यक्ष डॉ.संजय पुरंदरे, सचिव डॉ.तुषार गदादे, खजिनदार डॉ.चंद्रकांत पिल्ले, डॉ.सुहासिनी सोनवले, डॉ.अंजली खाडे, डॉ.स्वाती वणवे, डॉ.मनीषा शेळके, डॉ.निरुपा शहा, डॉ.सचिन घोरपडे, डॉ.अश्विनकुमार वाघमोडे, डॉ.संताजी शेळके, डॉ.आनंद वणवे, डॉ.आनंद हारके, डॉ.प्रमोद आटोळे, डॉ.मिनाक्षी देवकाते, डॉ.संदेश शहा, डॉ.गणेश बोके व राम नीचाळ, वैभव सत्रे, डॉक्टर व हेल्थ कॉच सरदार पांडे (टीम) हॉस्पिटल कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पोलीस जनसेवा संघटनेचे तालुकाध्यक्ष वस्ताद अस्लम शेख, दलित पँथर संघटनेचे पुणे जिल्हा संघटक गौरव आहिवळे, सत्याचा प्रहार संघटना संस्थापक अध्यक्ष मा.भालचंद्र महाडिक, बारामती लाईव्ह संपादक अमित बगाडेसह सर्व संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.