जीवन संघर्षात प्रभावी व्यक्तीमत्व नेहमीच यशस्वी होतात. जो माणुसकीतून माणसातला माणूसपण ओळखतो. कर्म,कृती आणि विचार यातून तो सर्व माणसासमोर झळकतो व प्रकटतो असे निर्मळ, स्वच्छ मनाचे बारामती नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण(दादा) गुजर आहेत. त्यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गर्दी म्हणजे किरणदादा यांनी मानसिक व बौद्धीक क्षमतेवर जे यश प्राप्त केले ते सर्वांना आदर्शवत ठरेल.
आपण ज्याला नेता, गुरू किंवा मार्गदर्शक मानतो त्याच्या प्रती असणारे निस्सीम प्रेम कसे असावे हे किरणदादांकडून जेवढे शिकावे तेवढे कमीच आहे. पवार कुटुंबियांच्या हितासाठी घरातील व्यक्तींशी सुद्धा वाईटपणा घेणारे किरणदादा आहेत. एवढे प्रेम, एकनिष्ठता, विश्र्वास, भक्ती त्यांची आहे. आजपर्यंत त्यांनी वैर सुद्धा प्रेमाने जिंकले आहे. त्यागातून त्यांनी भविष्यकाळ निर्माण केला आहे. ना.अजित पवार सांगतील ते काम व कार्य त्यांनी रात्रीचा दिवस करून, येणारे अडथळे दूर करीत एकाग्रतेने तडीस नेले आहे. या कार्यात त्यांना समोरच्या व्यक्तीच्या शिव्या, शापाचे धनी व्हावे लागले. मागे न हटता आरोप-प्रत्यारोपाला सामोरे जात कार्य सिद्धीस नेले. हे हृदयस्पर्शी काम नेत्यांनाच नव्हे तर इतरांनी सुद्धा अनुभवला आहे.
बारामतीत किती ज्ञानी लोकं आहेत मात्र या ज्ञानी लोकांना ते ज्ञान कुठे आणि केव्हा वापरायचे याचे ज्ञान तरी त्यांना पाहिजे. त्यांनी ते ज्ञान स्वत:पुरते व विशेषत: पै-पाहुण्यांपुरते वापरल्याने त्यांच्या ज्ञानी बुद्धीला गंज चढला आहे. त्यामुळे हा चढलेला गंज काढण्यासाठी उच्च विचार व सर्वांचा सर्वांगीण विकास हे ध्येय अंगी बाळगले तर गंज निघेल व तळागळातील नागरीक तुम्ही आल्यावर तोंड फिरवणार नाही तर तोंडभरून बोलतील व आशिर्वाद देतील.
किरणदादा पाडलेल्या वसाहतमधील गोर-गरीब लोकांच्या जीवनाशी एकरूप झाले आणि आहे त्याच ठिकाणी घरे देण्यासाठी शब्दबद्ध राहिले. यामुळे किरणदादा समाजसेवा करण्यास पात्र ठरलेले आहेत. अतिवृष्टीमुळे नद्या, ओढ्यांना आलेल्या पुरामुळे याच वसाहत वासियांची गंभीर अवस्था झाली होती. याच किरणदादांनी रात्रीत निवार्याची सोय करून भूकेलेल्यांना अन्नदान केले व पुराच्या पाण्यात दैनंदीन लागणार्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांची कपडे वाहुन गेले ही मुले वस्त्रहीन झाली होती त्यांना वस्त्र दिले. काहींच्या मते संपूर्ण नगरपालिका किरण गुजर चालवितात, पण नगरपरिषदेत किरण गुजर नसतील तर काही सोम्या-गोम्याकडून कारभार कसा चालेल याचा विचार करणे गरजेचे आहे. नगरपरिषदेच्या कित्येक कामात किरणदादांनी लक्ष घातले नाही त्याकामाची अवस्था पाहणे गरजेचे आहे. त्यांच्यावर सतत होत असलेली टिका, विरोध हीच तर समाजसुधारकास मिळालेली अभूषणे, बक्षिसे असतात असे समजून ते काम करीत आलेले आहेत. प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे तशी ना.अजित पवार ही त्यांच्या मनातील व्यक्ती आहे. त्यांना काही चुकीचे दिसले तर त्याठिकाणी ते मौन बाळगतात किंवा तेथुन कोणालाही काही एक न सांगता निघून जातात. अशा वृत्तीमुळे त्यांनी जिंकला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांना श्रीमंतीची गरज नाही ते लोकप्रियतेवर श्रीमंत झालेले आहेत. जो सुख-दु:खात साथ देतो त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस करण्याची त्यांची तयारी असते त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेला माणूस कधीही दुरावला जात नाही.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला थैमान घातले आहे. प्रत्येकाच्या मनात भितीदायक वातावरण निर्माण झालेले असताना रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना धीर देणे, रक्त, गोळ्या, इंजेक्शन, बेड, तत्पर सेवा उपलब्ध करून दिले. त्यांचा आत्मविश्र्वास वाढविण्याचा प्रयत्न केला. वाढती रूग्णांची संख्या पाहता त्यांनी स्वत: महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारले व नटराज नाट्य कला मंडळाच्या सभासदांकडून प्रत्येक रूग्णांची जेवणापासून ते औषध उपचारापर्यंत सोय केली होत रूग्ण बाहेर पडताना देवापेक्षा किरण गुजर व सेवा देणार्या टीमला देवारूपी मानून आशिर्वादाचा पाऊस पाडत होता. एक प्रकारे रूग्णाच्या गळ्यातील ताईत किरण गुजर होऊन बसले आहेत. आज हे सर्व रूग्ण सुख-दु:खात किरण गुजर यांना विसरत नाही. एवढं मोठे कार्य किरण गुजर यांनी बारामती तालुक्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील लोकांसाठी केलेले आहे. तमाम बारामतीकरांकडून खरा कोविड योद्धा म्हणून त्यांचा जाहीर सत्कार होणे गरजेचे आहे.
ज्यांचे कर्म चांगले नाही त्यांची आज मितीस काय परिस्थिती आहे हे सांगणे म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल. जवळचे मित्र,पै-पाहुणे जर दुरावत असतील तर त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. अशक्य गोष्टी शक्य करण्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे.
किरणदादांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणार्यांची गर्दी पाहुन, बारामतीकरांच्या तोंडातील किरण गुजर नसून मनातील किरण गुजर असल्याचा प्रत्यय आला आहे.
तैनुर शफिर शेख
संपादक, सा.वतन की लकीर