बारामती(उमाका): तालुका प्रशासनातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना आज जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. तहसिल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात तहसिलदार विजय पाटील यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती पी.डी. शिंदे, उप माहिती कार्यालयातील माहिती सहायक रोहिदास गावडे तसेच तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.