बारामती(वार्ताहर): पद्मविभूषण माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती वकील संघटना, इंडियन रेड क्रोस सोसायटी व स्व. माणिकबाई चंदूलाल सराफ ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करीत 51 वकिलांनी रक्तदान करून पवार साहेबांना मनापासून शुभेच्छा दिल्या. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता वकील संघटनेने 12 जानेवारी 2021 रोजी पवार साहेबांच्या वाढदिवसाचे निमित्त साधुन रक्तदान करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी राजमाता जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सोकेटे व ज्येष्ठ वकील ऍड.एस.एन.जगताप, ऍड.ए. व्ही.प्रभुणे, ऍड. भगवानराव खारतुडे, ऍड.निलीमा गुजर, वकील संघटनेचे उपाध्यक्ष ऍड. बापूराव शिंगाडे, ऍड.स्नेहा भापकर आणि पदाधिकारी यांचे हस्ते शिबिरास शुभारंभ करण्यात आले.
यावेळी वकील संघटनेचे ऍड.राजेंद्र काळे, ऍड.विजय तावरे, ऍड.रासकर व सरकारी वकील बाळासाहेब शिंगाडे, ऍड.विजयसिंह मोरे, ऍड.वसंतराव गावडे, ऍड.सचिन वाघ, ऍड. धीरज लालबीगे इ. बहुसंख्य वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यकम यशस्वी करण्यासाठी वकील संघटनेचे सचिव ऍड. अजित बनसोडेसह ऍड.गणेश शेलार, ग्रंथपाल ऍड.स्वरूप सोनवणे, महिला प्रतिनिधि ऍड.प्रणीता जावळे इ. मोलाचे परिश्रम घेतले. शेवटी वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सोकटे यांनी सर्वांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.