बारामती(वार्ताहर): बाळासाहेब पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे.
शास्त्र आणि तंत्रज्ञान विद्याशाखे अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना जे.एस.पी.एम. कॉलेजचे प्राध्यापक डॉ.प्रदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते विद्याप्रतिष्ठानचे कमल नयन बजाज इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभागामध्ये अससिस्टंट प्रोफेसर म्हणुन कार्यरत आहेत. तसेच त्यांना विद्या प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री शरदचंद्रजी पवार, संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.ए.व्ही. प्रभुणे, संस्थेचे विश्वस्त व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व सौ.सुनेत्रा पवार, विश्वस्त सौ.नीलिमा गुजर, डॉ.राजीव शाह, किरण गुजर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.