ग्रामपंचायत निवडणूका शांततेत पार पडण्यासाठी पोलीसांचा रूट मार्च

बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्र्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी या अनुषंगाने पोलीसांनी रूट मार्च काढण्यात आला. पोलीसांनी रूट मार्च काढून नागरिकांना भयमुक्त राहण्याचे आवाहन केले आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत मळद, पिंपळी व बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सांगवी,शिरवली, खांडज, निरावागज, मेखळी, सोनगाव, झारगडवाडी,घाडगेवाडी गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुक 2021 चे अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये महत्त्वाच्या चौकांमध्ये महत्त्वाच्या गावांमध्ये सरकारी वाहनातील पी.एस. सिस्टिम वरून आचारसंहिते बाबत तसेच 37(1)(3) व जिल्हाधिकारी यांच्याकडील 144 आदेशाबाबत माहिती देऊन सदर ग्रामपंचायत निवडणूक शांततेत निर्भयपणे पार बांधण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
सदर रूट मार्च करिता बारामती शहर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशन, बारामती आर.सी.पी पथक आणि बारामती वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!