बारामती(वार्ताहर): शंभूज् कॅफेचे उद्घाटन बुधवार दि. 6 जानेवारी रोजी नगरपरिषदेचे नगरसेवक जयसिंग देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शॉप नं.5, तांबे कमर्शियल कॉम्प्लेक्स्, सीटी-इन हॉटेल जवळ, भिगवण रोड, एम.आय.डी.सी.बारामती याठिकाणी कॅफे सुरू करण्यात आले असल्याचे नारायण घाडगे व अक्षय सपकळ यांनी सांगितले आहे.
यावेळी राष्ट्रवादी तालुका युवकाध्यक्ष राहुल वाबळे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, नगरसेवक समीर चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रताप पागळे इ. मान्यवर उपस्थित होते.
या कॅफेमध्ये कोल्ड व हॉट कॉफी, आईस्क्रीम, मिल्कशेक, सँडवीच, चॉकलेट इ. योग्य भावात ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे.