बारामती(वार्ताहर): नविन वर्षात संकल्प करूया, दारू नको..दूध पिऊया या अभिनव उपक्रमास नागरीकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बारामती शहर पोलीस स्टेशनचे दक्ष पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या संकल्पनेतून एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
गुल पुनावाला बागेसमोरील सर्व स्टॉलधारकांच्या वतीने मोफत मसाला दूधचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी उपस्थित लोकांना या उपक्रमाबाबत सांगून दारूमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजक राहुल (दादा) कांबळे, दीपक कुदळे, विजय जगताप, गणेश शेवाळे, सुनिल पालवे, सुधीर घोडके, सोनु क्षीरसागर, जितेंद्र धोत्रे, गणेश लंकेश्र्वर, योगेश शेवाळे, गणेश पवार यांनी केले. यावेळी सर्व स्टॉलधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाच्या वतीने मोफत मसाला दूधचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे म्हणाले की, वर्षाला निरोप देताना लोकं दारू पितात, अपघात होतात या अपघात मृत्यूमुखी पडतात या कार्यक्रमातून त्यांचे प्रबोधन करून दारू नको दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करा. नशेतून होणारी एकमेकांची भांडणे थांबतील असेही ते म्हणाले. महिलांनी मला तुमचा भाऊ समजा किंवा मुलगा समजा असं एक नातं जोडून आपण बारामतीसाठी चांगले काम करुयात चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट असं माझे काम आहे. त्यामुळे बारामती गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.
मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी माजी अध्यक्ष किरण इंगळे, बापू जाधव, स्वप्निल भागवत, अविनाश भापकर, उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मोहन भटीयानी, अरूण नलावडे, खजिनदार स्वप्निल शेळके इ. मंडळाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.